वाढदिवस साजरा करू नका – राज ठाकरे

मुंबई दि.११ – येत्या १४ जूनला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. मात्र त्या निमित्ताने मनसेच्या कार्यकर्त्यांनी पोस्टर, होर्डिंग, पेपर जाहिराती अथवा बॅनर लावू नयेत असे आदेश मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहेत. राज म्हणाले की माझे काका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जाऊन अजून वर्षही उलटलेले नाही. ते दुःख अजून मिटलेले नसल्याने यंदा वाढदिवस साजरा करायचा नाही असे ठरविले आहे.

शिवसेनेतून फूटून वेगळे निघाल्यानंतर राज आणि बाळासाहेबांचे संबंध बिघडले होते मात्र बाळासाहेबांच्या आजारपणात या दोन्ही ठाकरे कुटुबियात पुन्हा जवळीक निर्माण झाली होती. तसेच शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या शस्त्रक्रियेच्यावेळीही राज हजर राहिले होते आणि रूग्णालयातून त्यांना घरापर्यंत घेऊन आले होते.