मोदींना शुभेच्छा मात्र निवडणूक युती नाही – जयललिता

नवी दिल्ली दि. ११- तमीळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपबरोबर निवडणूकपूर्व युती करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपच्या प्रचार प्रमुख पदी निवड झालेल्या नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा आहेत मात्र निवडणुकीसाठी युती नाही असे त्या पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.

त्या म्हणाल्या की आगामी लोकसभा निवडणुकात अण्णा द्रमुक तमीळनाडूनतील ३९ व पुदुचेरीची १ अशा सर्व ४० जागांवर उमेदवार उभे करणार आहे. त्यामुळे भाजपशी युतीचा प्रश्नच येत नाही. आडवानींनी दिलेला राजीनामा हा भाजपचा अंतर्गत प्रश्न असल्याने त्याविषयी कांहीही बोलणार नाही मात्र त्याचवेळी वैयक्तीक पातळीवर नरेंद्र मोदी आपले चांगले मित्र आहेत आणि माझ्या शुभेच्छा कायम त्यांच्यासोबत आहेत असेत्यांनी सांगितले. गुजराथेतील विजय असो वा मोदींना पक्षातील उच्च पद मिळालेले असो मला त्यात आनंद आहे अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Leave a Comment