पाक महिला क्रिकटपटूंचा लैंगिक छळाचा आरोप

कराची दि.११ – पाकिस्तानच्या मुलतान विभागातील अनेक महिला क्रिकेटपटूंनी वरीष्ठांकडून व अधिकार्‍यांकडून लैंगिक छळाला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार दाखल केली आहे. एका टिव्ही चॅनलसमोर पाच महिला क्रिकेटपटूंनी अशी तक्रार केल्यानंतर त्याची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्वरीत दखल घेऊन चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमली असल्याचे समजते.

या महिला क्रिकेटपटच्या तक्रारीनुसार संघात निवड करण्यासाठी कोच व अन्य अधिकारी शरीरसंबंधाची मागणी करत आहेत. महिला क्रिकेट संघाच्या अध्यक्षा बेगम शमी सुलतान व अन्य क्लब अधिकारी या निंदनीय प्रकारासाठी दोषी असल्याचे या खेळाडूंचे म्हणणे आहे. हे लोक संघात निवड करण्यासाठी पैशांची मागणीही करतात असाही आरोप त्यांच्यावर केला गेला आहे. हिना गफूर, किरण खान, सीमा जावेद, मूर फातिमा आणि आलिहा शफीक या पाच महिला खेळाडूंनी या संबंधी तक्रार दिली आहे.

Leave a Comment