देशाला काँग्रेसमुक्त करणार- मोदी

पणजी : आगामी काळात देशाला काँग्रेसमुक्त करणे हेच आपले ध्येय आहे. गेल्या काही दिवसपासून काँग्रेसच्या नेतेमंडळीनी भ्रष्टाचाराचे सीमा ओलंडली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत त्याचा पराभव करण्यासाठी मैदानात उतरणार असल्याचे गुजरातचे मुख्यमंत्री तथा भाजपच्या प्रचारप्रमुख नरेंद्र मोदींनी जाहीर केले. गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते .

त्यापूर्वी अडवाणी यांच्या गैरहजेरीत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत आगामी लोकसभानिवडणुकीचे भाजपचे प्रचारप्रमुख नरेंद्र मोदींच्या नावाची घोषणा भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी केली. त्यामुळे आता वाजपेयी-अडवाणी युगाचा अंत झाला असून भाजपची सूत्रे आता मोदी यांच्याकडे आली आहेत.

२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या प्रचाराची धुरा गुजरातचे मुख्यंमंत्री नरेंद्र मोदी यांच्या खांद्यावर राहणार आहे. अपेक्षेप्रमाणे आज भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी मोदींना दिलेल्या बढतीची घोषणा केली. पण या घोषणेच्या वेळी भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी मात्र अनुपस्थित होते.

Leave a Comment