मुंबई – राज्यातील मंत्रीमंडळातील विस्ताराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसमध्येही फेरबदलाचे संकेत आता वाहू लागले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाचे संकेत मिळत असून याबाबत शुक्रवारी शिवाजीराव मोघे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्लीत सोनिया गांधींशी चर्चा केली आहे. दरम्यान शनिवारी दिल्लीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सोनिया गांधीं यांची भेट घेणार असल्याचे सुत्राकडून समजते.
शुक्रवारी राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी घेतले. येत्या चार दिवसात मंत्रिंमडळात फेरबदल करण्यात येणार असल्याचे समजते. त्यमुळे आता राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसमध्येही बदलाचे वारे वाहू लागले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्षही बदलण्याची जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे. तसेच राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळ फेरबदलात काँग्रेसमध्ये फेरबदल केला जाण्याची शक्यता आहे.
काँग्रेसच्या कोट्यात दोन ते तीन जागा गेल्या काही दिवसांपासून रिक्त आहेत. त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. त्या विस्तारामध्ये आपलीच वर्णी लागावी म्हणून अनेकानि फिल्डिंग लावली आहे.