प्रतिमा सुधारण्यासाठी शरद पवारांचा धक्का

मुंबई: राज्यात निवडणुकीपूर्वीच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या काही काळात विविध घोटाळ्यांमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची नावे आल्याने पक्षाची प्रतिमा डागाळली होती. त्यामुळे शरद पवार यांनी धक्कातंत्राचा वापर केला असून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा पवार यांनी राज्यातील सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेतले आहेत. आगामी काळात राष्ट्रवादीचा प्रदेशअध्यक्ष सुद्धा बदलण्यात येणार आहे.

काही महिन्यांपूर्वी घेण्यात आलेल्या एका सर्व्हेमध्ये राष्ट्रवादीला लोकसभेच्या अवघ्या चारच जागा मिळतील असा अंदाज व्यक्त आला होता. सध्या लोकसभेच्या आठ जागा असलेल्या राष्ट्रवादीच्या जागा निम्म्याने कमी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण होते. त्यामुळे आता सर्वच जन खडबडून जागे झाले आहेत.

राज्यातील सर्व २० मंत्र्यांचे राजीनामा घेतल्यानंतर त्यांच्या जागी नवीन चेह-यांना मंत्रिपद देण्यात येईल, अशी सध्या चर्चा आहे. उपयुक्ततेनुसार नव्या मंत्र्यांची निवड करणार येणार असल्याचे कळते .पण नवीन चेह-यांना संधी दिल्यानंतर घोटाळ्यांमध्ये नावे आलेल्या दिग्गजांचे मंत्रिपद काढून घेण्याचे धाडस आगामी होणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Leave a Comment