राजस्थानत मिग २१ कोसळले

बाडमेर दि. ७- भारतीय वायुदलाचे मिग २१ हे फायटर जेट विमान आज सकाळी साडेनऊच्या सुमारास सोडियार गावाजवळ कोसळले. राजस्थानातील बाडमेर जवळ असलेल्या उतरलई बेसवरून हे विमान रोजच्या सरावासाठी उडाले होते पण कांही काळातच ते कोसळले. मात्र पायलटने अगोदरच विमानातून उडी मारल्याने त्याचा जीव बचावला आहे असे सांगण्यात आले आहे.

जोधपूर एअरबेसवरून तातडीची मदत पाठविण्यात आली असून या अपघाताची कोर्ट ऑफ एन्क्वायरी करण्याचे आदेश दिले गेले आहेत. या विमानाने उड्डाण करताच उतरलई बेसपासून ४० किमी अंतरावर ते अचानक कोसळले असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.