दहावीतही मुलींचीच बाजी

मुंबई: यंदाच्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी दुपारी जाहीर झाला आहे. राज्यातील 83.48 टक्के विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. बारावीप्रमाणेच दहावीतही मुलींनीच बाजी मारली आहे. कोकण विभाग मात्र यावेळी अव्व्ल्स्थनी आहे. सर्वाधिक निकाल कोकण- 93.79 टक्के या विभागाचा लागला आहे तर सर्वात कमी निकाल 73.75 टक्के विभागाचा लागला आहे.

यावर्षी बारावी प्रमाणेच दहावीतही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 84.90 टक्के, तर मुलांचा निकाल 82.24 टक्के इतका लागला आहे. कोकण विभागाने दहावीतही आगेकूच कायम ठेवली आहे.

दहावीचा विभागवार निकाल- कोकण- 93.79 टक्के, कोल्हापूर- 90.36 टक्के, मुंबई- 88.92 टक्के, पुणे- 88.25 टक्के,नाशिक – 83.86 टक्के, औरंगाबाद 81.18 टक्के’, नागपूर – 73.99 टक्के, अमरावती – 74.60 टक्के, लातूर – 73.75 टक्के इतका निकाल लागला आहे.

Leave a Comment