मनसेत होणार संघटनात्मक फेरबदल

मुंबई – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक फेरबदल करण्याचे संकेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत दिले आहेत. नाशिकमधील मनसेतून शिवसेनेत गेलेले नेते हेमंत गोडसे यांनी केलेले आरोप पाहता राज ठाकरे यांनी त्याची गंभीर दाखल घेतली असून ते लवकरच नाशिकचा दौराही करणार आहेत. त्यानंतर ते घटनात्मक फेरबदल करणार असल्याचे समजते.

राज ठाकरे यांचा राज्यव्यापी दौरा मार्च महिन्यात संपला. त्यानंतर राज्यभरात मनसेची झालेली घोडदौड, जिल्ह्याप्रमाणेच तालुकानिहाय परिस्थितीत, आगामी धोरण व पक्षाची भूमिका याबाबत पदाधिकार्यांशी चर्चा करण्याकरिता मुंबईत बैठक झाली. आमदार आणि प्रदेश पदाधिका-र्यांना `दत्तक` दिलेल्या जिल्ह्यांचे दौरे करून संभाव्य फेरबदलांची चाचपणी करण्याचे आदेशही त्यांनी दिल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.

जिल्हानिहाय आढावा घेतल्यानंतर ठाकरे यांनी सर्वप्रथम प्रत्येक पदाधिकारी व आमदारांनी घेतलेल्या `दत्तक` जिल्ह्यात काय परिस्थिती आहे याचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी पुन्हा जिल्हा दौरे करून त्याचा अहवाल नाशिकमधील पक्षाचे मुख्यालय असलेल्या राजगडावर सादर केला जाणार आहे. त्यानंतर राज ठाकरे स्वत संघटनात्मक फेरबदलांबाबत निर्णय घेतील, असे एका आमदाराने सांगितले.

Leave a Comment