बिल गेटसना हवी आमीरखानची भेट

मुंबई दि.१ – मिस्टर परफेक्शनिस्ट अशी स्वतःची ओळख निर्माण केलेल्या बॉलिवूड अभिनेता आमीरखानच्या लोकप्रियतेने भारताच्या सीमा केव्हाच पार केल्या आहेत. त्याच्या फॅनमध्ये आता सर्वसामान्य नागरिकांबरोबरच अतिधनाढ्य व्यक्तींही समाविष्ट होऊ पाहात असून मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आणि गेटस फौंडेशनचे संस्थापक बिल गेटस यांनीही आमीरखानच्या भेटीची इच्छा असल्याचे आपल्या ब्लॉगवर लिहिले आहे.

गेटस लिहितात, बॉलिवूड स्टार आमीरखानच्या भेटीची मला इच्छा आहे. एक अभिनेता, कलाकार याचबरोबर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तो फार चांगले काम करतो आहे. बाल पोषणासंबंधी युनिसेफचा राजदूत म्हणून तो जे काम करतो आहे त्याविषयी मला जाणून घ्यायचे आहे. तसेच भारतापुढे सध्या ज्या गंभीर सामाजिक समस्या आहेत त्यासंबंधात त्याने केलेल्या सत्यमेव जयते या टिव्ही शो बद्दलही मला त्याच्याकडून ऐकायचे आहे. आणि आमीरने मला जर नृत्याच्या कांही स्टेपस करून दाखविल्या तर मी स्वतःला फारच भाग्यवान समजेन.

गेल्या वर्षी आमीरने सत्यमेव जयते या शोद्वारे प्रथमच टिव्ही क्षेत्रात पदार्पण केले आहे आणि या शोने त्याची जागतिक स्तरावर सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळख निर्माण केलेली आहे.

Leave a Comment