पुणे,दि.31(प्रतिनिधी)- काही हजार वर्षापूर्वी भारत हे जगातील ज्ञानविज्ञानाचे केंद्र होते पण आज एकाही भारतीय विद्यापीठाला जागतिक दर्जा नाही की कोणाला येथे नोबेल मिळालेले नाही, नव्या पिढीने त्याचा विचार करायला हवा, शैक्षणिक अभ्यासक्रम बदलण्यासाठी आपण पावले उचलायाला हवे.असे राष्ट्रपती प्रणव मुखजी यांनी येथील डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ आर्मामेंट टेक्नॉलॉजीमध्ये संशोधकासमोर बोलताना सांगितले.
देशातील शैक्षणिक वातावरणामध्ये बदलाची गरज- राष्ट्रपती
गिरीनगर, खडकवासला येथील डिफेन्स इन्स्टिटयुट ऑफ अॅडव्हानस्ड टेक्नॉलॉजीच्या(डी.आय.ए.टी)चा सातवा पदवी प्रदान संमारभराष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यपाल के.शंकरनारायण,संरक्षण मंत्री ए.के.अँटनी,गृहनिर्माण आणि उद्योग राज्यमंत्री सचिन अहिर,अणूऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आर.के.सिन्हा,संरक्षण मंत्रालयाचे वैज्ञानिक सल्लागार बी.के.सारस्वत, संस्थेचे कुलगुरू डॉ प्रल्हाद आदी उपस्थित होते.
आपली लोकशाही संरक्षण दलामुळे अधिक संमृद्ध झाली आह, असे सांगताना राष्ट्रपती म्हणाले, देशाची सुरक्षितता मजबूत राखण्यास संरक्षण दलाबोरबरच विज्ञान-तंत्रज्ञान, अत्याधुनिक तंत्रज्ञान या क्षैत्रात संशोधन करणार्या आणि त्यासाठी कुशल मनुष्यबळाची निर्मिती करणार्या डी.आय.ए.टी सारख्या संस्थाचे महत्व आहे. डी.आय.ए.टीने संरक्षण दलाच्या तिन्ही विभागासाठी लागणार्या अत्याधुनिक प्रणाली विकसित केल्या आहेत.देशाच्या आर्थिक आणि सर्वांगीण प्रगतीसाठी यासारख्या आणखी संस्थाची आवश्यकता आहे. देशातील उच्च शिक्षणाची गुणवत्ता उंचवण्यासाठी शिक्षणाची गुणवत्ता, शिक्षणाची उपलब्धता आणि शिक्षकांची संख्या यात वाढ करायला हवी.यासाठी ई-एज्युकेशनचा वापर करायला हवा.शिक्षण संस्थातून केवल परीक्षार्थी बाहेर पडता कामा नये.जीवानातील प्रत्येक आव्हानाला सामोरे जाऊ शकेल,असे विद्यार्थी घडविण्यास शिक्षण व्यवस्थेने पुढाकार घ्यायला हवा,असे राष्ट्रपती मुखर्जी यांनी सांगितले.
हे दशनक नाविन्याचे दशक म्हणून घोषित करण्यात आले आहे,असे सांगून राष्ट्रपती म्हणाले, देशात संशोधनास अनुकुल असे आणि वातावरण निर्माण करण्यास विद्यापीठे आणि संशोधन संस्थानी पुढकारा घ्यायला हवा.कराण सध्याच्या ज्ञानाधिष्ठित समाजरचना आणि अर्थव्यवस्थेत पुढे जायचे असेल तर संशोधन आणि नाविऩ्याचा ध्यास घ्यावा लागणार आहे.
यावेळी संरक्षण मंत्री ए.के.अॅटनी यांनी देशापुढील संरक्षण आणि सुरक्षितेचे आव्हान पेलण्यास संरक्षण दल सज्ज आहे.संरक्षण दलाची सिध्दता आणि सक्षम करण्यासाठी डिफेन्स इन्स्टिटयुट ऑफ अॅडव्हान्स्ड टे्ननॉलॉजी सारख्या संस्थांचे योगदान मोलाचा आहे. यावेळी डॉ प्रल्हाद यांनी प्रस्ताविक तर रजिस्ट्रार अंजन दासगुप्ता यांनी आभार मानले.यावेळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व संरक्षण मंत्री ए.के.अँटनी यांच्या हस्ते 90 विद्यार्थ्यांना प्रदवी प्रदान करण्यात आले.त्यात सहा विद्यार्थ्यांना पी.एचडी,सहा विद्यार्थ्यांना एम.एस आणि 78 विद्यार्थ्यांना एम.टेक पदवी प्रदान करण्यात आली.
