श्रीलंकेत बनणार सीतामाईचे मंदिर

पन्ना दि. ३० – श्रीलंकेत ज्या ठिकाणी सीतामाईने अग्निपरिक्षा दिली असा समज आहे, त्या जागेवर सीतामाईचे भव्य मंदिर उभारण्यात येत असल्याचे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी जाहीर केले आहे. ते म्हणाले की आम्ही बरेच दिवस यासाठी प्रयत्न करत होतेा त्याला यश आले असून श्रीलंकन सरकारनेही या जागी मंदिर उभारण्यासाठी परवानगी दिली आहे. भारत सरकारची परवानगीही आवश्यक होती मात्र ती मिळण्यास थोडा विलंब लागला. तरी आता भारत सरकारनेही या मंदिरासाठी परवानगी दिली आहे त्यामुळे मंदिराचे काम लवकरात लवकर सुरू केले जात आहे.

मध्यप्रदेश सरकार या मंदिर उभारणीसाठी १ कोटी रूपये देणार आहे असे सांगून चौहान म्हणाले की हा आपल्या देशाचा वारसा आहे आणि तो जपला पाहिजे. सांची येथेही बौध्द विश्वविद्यालय सुरू करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.