गृहमंत्रालयाकडून स्पॉट फिक्सिंगची चौकशी व्हावी – पवार

मुंबई, दि.३० – मी बीसीसीआयच्या अध्यक्षपदी मी राहिलो असतो, तर ही वेळ आली नसती. गृह मंत्रालयाकडून स्पॉट फिक्सिंगची चौकशी करायला हवी, असं मत बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. स्पॉटफिक्सिंग प्रकरणामुळे बीसीसीआयची प्रतिमा मलिन झाल्याचंही ते म्हणाले.

पवार म्हणाले, बीसीसीआयच्या कोणत्याही पदावर नसल्यानं मी राजीनामा मागू शकत नाही. शशांक मनोहर यांचा सल्लाही योग्यच असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. सर्व आयपीएलच्या सामन्यांची चौकशी व्हावी, असा सल्ला बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांनी दिला होता. त्यानुसार आयपीएलच्या सर्व सामन्यांची चौकशी व्हावी, असं मत शरद पवारांनी ना व्यक्त केलं आहे.