राजीनाम्याची मागणी करणारी राष्ट्रवादी काँग्रेस कोण? – श्रीनिवासन

मुंबई, दि.26 – आपल्यावर सोपवलेली जबाबदारी आपण अखेरपर्यंत पार पाडणार आहोत बीसीसीआयच्या कोणत्याही पदाधिकार्‍यांने आपला राजीनामा मागितलेला नसल्याने राजीनामा देण्याचा प्रश्न येत नाही असे बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस बीसीसीआयचा सदस्य नाही. त्यामुळे त्यांच्या प्रश्नाेला उत्तर देण्याचा प्रश्नपच उद्भवत नाही, असे स्पष्टीकरण देत बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांनी राष्ट्रवादीच्या मागणीबाबत विचारले असता हा मुद्दा उडवून लावला.

आयपीएलमधील मॅच फिक्सिंगप्रकरणी अडचणीत आलेल्या श्रीनिवासन यांनी पुन्हा एकदा राजीनामा देणार नसल्याचा पुनरूच्चारही करताना बीसीसीआयचा अध्यक्ष आणि मयप्पन यांचा सासरा म्हणून उद्भवलेली परिस्थिती कठीण आहे, अशी कबुलीही यावेळी बोलताना दिली आहे. मयप्पनच्या नियुक्तीत आपली कोणतीही भूमिका नसून त्याची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रकरणी निष्पक्षपणे चौकशी करण्यात येत असून त्यासाठी पाच जणांची समिती नेमण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी दिली. पोलिसांच्या चौकशीत पूर्णपणे सहकार्य करण्यात येणार असल्याचे श्रीनिवासन म्हणाले.

Leave a Comment