समाजवादी पक्षाचं मिशन मुंबई

मुंबई, दि.23 – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी नवी मुंबईतील यूपी भवनाचं कारण देत गुरूवारी मुंबई भेट घेतली. मात्र त्यामुळे तर्क वितर्कांना उधाण आले असून समाजवादी पक्षाचं पुढचं लक्ष्य मुंबई असल्याची चर्चा जोरात सुरु झाली आहे. यादव यांची मुंबई भेट म्हणजे पक्षाची मुंबईत पाळेमुळे रोवण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.

देशातील सर्वच राज्यांच्या भवनांसाठी सिडकोने नवी मुंबईत भूखंड दिले आहेत. ही सगळी भवनं वाशी स्टेशनसमोर उभारण्यात आली आहेत. याच ठिकाणी यूपी भवनालाही भूखंड देण्यात आला आहे. सिडकोने दिलेल्या या भूखंडावर यूपी सरकारकडून भवनाची उभारणी करण्यात आली आहे. त्या भवनाचे उद्घाटन गुरूवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या हस्ते झालं. या भवनामध्ये काही खास पाहुण्यांसाठी १५ एसी रुम उभारण्यात आल्या आहेत.

Leave a Comment