संजय दत्त पोहोचला येरवडा कारागृही

पुणे दि.२२ – मुंबई १९९३ बॉम्बस्फोट खटल्यात अवैध शस्त्रप्रकरणी शिक्षा झालेला बॉलीवूड अभिनेता संजय दत्त याला आज पहाटे मुंबईच्या ऑर्थर रोड कारागृहातून पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात हलविण्यात आल्याचे वृत्त आहे. त्याला येरवडा कारागृहात स्वतंत्र खोलीत ठेवण्यात आल्याचेही समजते.

मुंबईहून पहाटे चारच्या सुमारासच संजय दत्त याला तीन पोलिस व्हॅनच्या पहार्याणतून पुण्यात आणण्यात आले. या संपूर्ण प्रवासाबाबत अतिशय गुप्तता पाळण्यात आली होती. सुरक्षेचे कारण तसेच प्रसिद्धीमाध्यमांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ही काळजी घेण्यात आल्याचे संबंधित अधिकार्यां्नी सांगितले. संजय १६ मे या दिवशी टाडा न्यायालयासमोर हजर झाल्यानंतर त्यला प्रथम ऑर्थर रोड कारागृहात अंडासेल मध्ये ठेवण्यात आले होते. आता येरवडा कारागृहात तो त्याची उरलेली साडेतीन वर्षांची शिक्षा भोगणार आहे.

पुण्याच्या अतिरिक्त तुरूंग महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांनीही संजयला येरवडा कारागृहात आणण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे मात्र त्याची व्यवस्था कशी करण्यात आली याबाबत त्यांनी कांहीही बोलण्यास नकार दिला.

Leave a Comment