ईशान्येच्या ९ जणांचा एव्हरेस्टवर ‘तिरंगा’

इटानगर, दि. २० – भारतीय गिर्यारोहकांसाठी शनिवारचा दिवस म्हणजे सुवर्णाक्षराने लिहून ठेवावा, असाच ठरला. शुक्रवारी तिघा जणांनी जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केल्यानंतर ईशान्य भारतातील आणखी ९ गिर्यारोहकांनी शनिवारी एव्हरेस्ट पादाक्रांत केले. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास ६ जणांनी दक्षिण कोलहून अंतिम चढाईस सुरुवात केली. प्रतिकूल हवामान, तुफानी वारे आदींना रात्रभर तोंड देत नेपाळच्या स्थानिक वेळेनुसार पहाटे ५ वाजून ५० मिनिटांनी त्यांनी एव्हरेस्टवर पाऊल ठेवले, अशी माहिती अरुणाचल माऊंटेनिअरिंग अँड अॅनडव्हेंचर स्पोर्ट्स असोसिएशन (एएमएएसए) चे अध्यक्ष त्सेरिंग वांजे यांनी दिली.

या गिर्यारोहकांमध्ये मणिपूरच्या एका १६ वर्षीय तरुणाचाही समावेश असून एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारा तो सर्वांत तरुण भारतीय बनला आहे. यापूर्वी, शुक्रवारी ईशान्येकडच्या तिघा जणांनी एव्हरेस्टवर तिरंगा रोवला होता. दरम्यान, राहा मुहाराक या सौदी अरेबियाच्या महिलेनेही एव्हरेस्ट सर केले आहे. असा पराक्रम करणारी राहा ही पुराणमतवादी आणि महिलांना कठोर बंधनात ठेवणार्‍या सौदी अरेबियाची पहिली महिला ठरली आहे.

Leave a Comment