
मुंबई, दि.१८ – मे महिन्याच्या अखेरीस काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्राच्या दौर्यावर येणार आहेत. या वेळी ते पुण्यातही येण्याची शक्यता असल्याचे समजते.
पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन काँग्रेसची स्थिती आणि सज्जता जाणून घेण्यासाठी राहुल विविध राज्यांचा दौरा करत आहेत. महाराष्ट्र दौर्याचा कार्यक्रम निश्चिहत झालेला नाही. मात्र, २७ आणि २८ मे या तारखांना ते राज्याच्या दौर्यावर येतील, असे पक्षाच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. यावेळी ते पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
