झुरळाला भिऊन पलंगाखाली लपतो रणबीर

बॉलीवुडमध्ये एका पेक्षा एक हिट सिनेमा देणारा अभिनेता रणबीर कपूर रियल जीवनात मात्र खुपच भित्रा आहे. घरामध्ये जर त्याला झुरळ दिसले तर तो भिऊन पलंगाखाली लपतो. अशी माहिती तिची जवळची मैत्रीण व अभिनेत्री दीपिका पदुकोन हिने रणबीर समोरच पत्रकारांना दिली. हा प्रकार ऐकून सर्वचजन हसू लागले.

बॉलीवुड मधील लवली कपल दीपिका आणि रणबीर कपूर यांचा आगामी काळात ‘ये जवानी है दीवानी’ हा सिनेमा येत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनच्या कामात सध्या दोघेजण व्यस्त आहेत. गेल्या पाच वर्षापासून एक्स गर्ल फ्रेंड दीपिका ही रणबीरला खुप चांगल्या पद्धतीने ओळखते. यामुळे तिने काही पत्रकार परिषेदेत किस्से सांगितले.

दीपिका म्हणाली, ‘ रणबीर हा कॉकरोचला खूपच भितो. त्याला जर घरात कुठे झुरळ आढळले तर तो पहिल्यांदा हाकलून देतो. झुरळ नाही गेल्यास पलंगाच्या खाली जाऊन लपतो. हे कित्येक वेळा मी डोळ्याने पहिले आहे. तो रियल लाईफ मध्ये खूपच भित्रा आहे. याची प्रचीती मला अनेकवेळा आली आहे.

Leave a Comment