अभिनेता अभय देओल लवकरच आता स्मॉल स्क्रीनवर झळकणार आहे. सुरुवातीच्या काळात त्याने टीवीवर येण्याचा विचार केला नव्हता. मात्र त्याला तशी ऑफर आता चालून आली आहे. त्यामुळे आता लवकरच त्याने टीवीवर झळकण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.

आगामी काळात जी टीवीवर ‘कनेक्टेड हम तुम’ हा रिऐलिटी शो सुरु होत आहे. या मध्ये तो होस्टचे काम करणार आहे. याबाबत अधिक बोलताना अभिनेता अभय देओल म्हणाला , ‘मी टीवीवर येण्याचे काही ठरविले नव्हते. तसा काही आतापर्यंत तरी माझा प्लान नव्हता. त्यामुळे लेट वगेरे येण्याचा काही प्रश्नच उपस्थित होत नाही. या शो मध्ये काम करण्यास मला आवडेल. त्यामुळे मी हा शो करण्याचे ठरविले आहे. या रियलिटी शो मध्ये मी होस्ट म्हणून काम करणार आहे. ‘
आगामी काळात येत असलेल्या या शो मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम करणा-या सहा महिला असणार आहेत. त्यांचा कैमरा प्रत्येकवेळी फॉलो करणार आहे. येत्या काळात अभय देओल बिग स्क्रीनवर आनंद रायच्या ‘रांझना’ या सिनेमात अभिनेत्री सोनम कपूर आणि साउथचा स्टार धनुष सोबत झळकणार आहे.