धक धक गर्ल माधुरी झाली ४७ वर्षाची

गेल्या तीन दशकापासून लाखो दिलाची धडकन असलेली धक धक गर्ल माधुरी दीक्षितचा आज वाढदिवस आहे. तिने वयाचे ४६ वर्ष पूर्ण केली आहेत. तिने १९८० आणी ९० च्या दशकात नृत्य और स्वाभाविक अभिनयाच्या जोरावर ती देशाची धडकन झाली होती.१५ मे १९६७ साली मुंबईमधील मराठी कुटूबात तिचा जन्म झाला. लहानपणा पासून तिची डॉक्टर होण्याची इच्छा होती. मात्र ती पूर्ण न झाल्याने तिने डॉक्टर असलेले पती श्रीराम नेने सोबत लग्न केले.

सिने करियरची सुरूवात तिने १९८४ मध्ये राजश्री प्रोडक्शनच्या ‘अबोध’ या सिनेमातून केली. त्यानंतर ‘एक, दो, तीन’ हे गाणे त्याकाळी माधुरीसाठी नवीन क्रेज झाले होते.१९९० साली प्रदर्शित झालेल्या ‘दिल’ या सिनेमासाठी तिला दमदार अभिनयाचा फिल्म पहिला फिल्म फेयर पुरस्कार मिळाला.

माधुरी दीक्षितची जोडी अभिनेता अनिल कपूरसोबत खूपच फेमस झाली होती. अनिल-माधुरीच्या जोडीने त्याकाळी ‘तेजाब’, परिंदा’, ‘राम-लखन’, ‘किशन कन्हैया’, ‘जीवन एक संघर्ष’, ‘जमाई राजा’, ‘खेल’ ‘बेटा’, ‘जिंदगी एक जुआ’, ‘राजकुमार’, ‘पुकार’ हे हिट सिनेमे केले.

माधुरी दीक्षितला आतापर्यंत पाच वेळा फिल्म फेयर पुरस्कार मिळाला आहे. त्याशिवाय भारतीय सिनेमाच्या योगदानाबद्दल २००८ मध्ये तिला नागरिक सम्मान पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे.
माधुरी दीक्षितने तिच्या सिने करियरमध्ये ७० सिनेमातून काम केले आहे. ती पुन्हा एकदा आता इंडस्ट्रीमध्ये कम बैक करीत आहे. सध्या तिचे ‘गुलाब गैंग’ आणि ‘डेढ़ इश्किया’ हे सिनेमे लवकरच रिलीज होणार आहेत.