विनोदी थरारपटाचा नवा प्रयोग-गो गोवा गॉन

भारतीय चित्रपटसृष्टष्टीच्या शताब्दीनिमित्त अनेक निर्माते, दिग्दर्शक
वेगवेगळे प्रयोग करत आहेत. बॉलिवूडमध्ये आतापर्यंत भूत, प्रेत, आत्मा
आणि असामान्य घटनांवर आधारित चित्रपट आले आहेत, राज आणि डीके या नव्या
दमाच्या दिग्दर्शक जोडेने आपल्यासमोर पुन्हा एकदा सुपरनॅचरल आणि हॉरर असा
गो गोवा गॉन चित्रपट आणला आहे याचे वैशिष्ट्ये म्हणजे हा कॉमेडी थ्रिलर
आहे.

गो गोवा गॉन ही हार्दिक (कुणाल खेमू) आणि लव (वीर दार) बन्नी (आनंद
तिवारी) या तीन मित्रांची कथा आहे. नोकरी करून मिळणार्‍या गल्लेलठठ्ठ
पगाराचे करायचे काय? या प्रश्‍नाचे सोपे उत्तर म्हणजे एक्साईटमेंट वाटेल
अशी नशा क्करा हा फंडडा आजचे काही युवक वापरतात त्यात समावेश असलेले हे
तीन मित्र आहेत. लवची गर्लफ्रेंड त्याला सोडुन जाते, हार्दीकची नोकरी
जाते यामुळे फस्स्ट्रेीस्शन्न दुर करण्याीसाठठी ते गोव्याला एन्जॉय
करायला जातात. तीथे लवची ओळख लूना (पूजा गुप्ता) बरोबर होते. लूना
तीघांना रशियन माफिया बोरिसने (सैफ अली खान) आयोजीत केलेल्या अंडरराऊंड
रेव्ह पाटर्टीला येण्यालचे निमंत्रन देते. या ठिकाणी हे सर्व जण अंमली
पदार्थाचं सेवन करतात आणि जेव्हा ते शुद्धीत येतात तेव्हा ते झोम्बोच्या
कचाट्यात सापडलेले असतात. आणि सूरू होतो जगण्याचा संघर्ष.
आज पर्यंत अनेक हिंदी चित्रपटात भूत, आत्मा, डायन असे प्रकार आपण पाहिले
आहेत. झोंम्बो हा प्रकार आपल्या साठी नविन आहे. हॉलिवुडमध्ये अनेक
चित्रपट झोंम्बोवर आलेले आहेत. झोंम्बो असे प्राणी आहेत ज्यांची संवेदना
हरवलेल्लली आहे मात्र ते रक्त पिपाऊ आहेत. झोंम्बोने आपल्याला चाव घेतला
तर आपणही झोंम्बो होतो एक शब्ब्दात सांगायचे तर झोंम्बो जिवंत मुडदे
असतता.

राज-डीके या दोघांनी ही कथा रोमांचक आणि विश्वसनीय बनवण्यासाठी आटोकाट
प्रयत्न केला आहे. पहिल्यांदा पाहिलं तर हा चित्रपट थोडा विचित्र वाटतो
पण, हा चित्रपट युवकांची मानसिकता लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. एका
हॉरर, थ्रिलर विषयाला राज आणि डीकेने दिलेला कॉमेडडीचा तडका उत्तम आहे.
सैफ अली खाननं आपली भूमिका पूर्ण जोशात निभावलीय. कुणाल खेमू आणि वीर दास
यांची जोडी चांगलीच जमलीय. अभिनेत्रींना या चित्रपटात काही खास जागा
देण्यात आलेली नाही. कॉमेडी असली तरी हा चित्रपट अव्हानात्मक पदद्धतीने
मांडण्यात आला आहे.पटकथेमध्ये कॉमेडीचा वापर योसग्य पधातीने करण्यात आला
आहहे यात शंका नाही. भितीदायक वातावरण थोडं हलकं फुलकं करण्याच काम
विनोदाने केले आहे, त्यामुळे चित्रपटत रक्तपात दिसला तरी प्रेक्षकांचं
हसू मात्र कायम राहतं. या चित्रपटातली गाणी चांगलीच जमलीत. थीमनुसार
असल्यामुळे ती पाहायलाही चांगली वाटतात. संवाद लहिण्याची पद्धत चांगलीच
आहे. कुणाल खेमू, वीर दास आणि आनंद तिवारी यांच्याीस्सह सैफचा अभिनय
अभिनय पाहण्यासारखा आहे. जास्त महत्त्व नसलं तरी पूजा गुप्तानेही आपल्या
अभिनयाची जादु दाखवली आहे. राज आणि डीके या दिग्दर्शक जोडडीला एका
वेगळ्या प्रयोगासाठी द्यायला च हवी. कॉलेजियन्सला हा चित्रपट आवडेल यात
शंका नाही.

चित्रपट – गो गोवा गॉन
दिग्दर्शक – राज आणि डीके
कलाकार – सैफ अली खान, कुणाल खेमू, वीर दार, आनंद तिवारी

रेटिंग – * * *