कामावर निष्ठा ठेवून प्रयत्न केल्यास यश नक्की -पानिपतकार विश्‍वास पाटील

पुणे, दि. 11 (प्रतिनिधी) – वीस पंचवीस वर्षांपूर्वी कले्नटर व्हायची परीक्षा देतोय असं बोललो तर लोक हसायचे. आज राज्यातील परिस्थिती बदलली आहे. चंदीगड, दि‘ीची परिस्थिती आज पुण्यात आहे. यूपीएससी पास होणार्‍या विद्यार्थ्यांची सं‘या वाढत आहे. कामावर निष्ठा ठेवून प्रयत्न केल्यास अपयश कधीच येत नाही, असे प्रतिपादन आएएस तथा पानिपतकार विश्‍वास पाटील यांनी शनिवारी केले.
सिनर्जी स्टडी पॉईंटच्या वतीने यूपीएससी परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला, त्यावेळी पाटील बोलत होते. सौरभ देशपांडे, अमोल खैरनार, ’ारूख नाईकवाडे, अतुल हांडे आदी यावेळी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, राज्यातील विद्यार्थ्यांची सं‘या यूपीएससीमध्ये वाढत असली तरी काही वर्षांपूर्वी ती अत्यंत वाईट होती. कले्नटर होणे महाराष्ट्रातल्या माणसाच्या आवा्नयाबाहेरची गोष्ट समजली जायची. परीक्षेची तयारी करतोय हे सांगण्याचीही चोरी होती. आज पुण्यात विविध संस्था मार्गदर्शन करीत आहेत. पूर्वी ’क्त दि‘ीत ही व्यवस्था होती. कोणतीही परीक्षा पास होण्यासाठी अभ्यास करू नका तर अभ्यासातून भारतीय संस्कृती समजून घ्या. कारण परीक्षेत यश अपयश आले तरी तुम्ही अभ्यासाने सुसंस्कृत होता आणि ती आयुष्याची संपत्ती असते. मराठी अधिकारी देशभरात विविध पदावर उत्तम कार्य करत आहेत. शिवाजी लांडे सारखे आयपीस अधिकारी पोलीस म्हणजे काय असते हे बिहारमध्ये दाखवत आहेत. तशीच कर्तव्यनिष्ठा तुम्ही दाखवा, असे अवाहन पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यंना केले.
’ारूख नाईकवाडे, कौस्तुभ दिवेगावकर, नेहा देशपांडे, विजय कुलंदे आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. अतुल हांडे यांनी प्रास्ताविक केले.

Leave a Comment