ढाका, दि.8 -बांगलादेशात मागील महिन्यात घडलेल्या इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा आठशेवर पोहचला आहे. कोसळलेल्या आठ मजली इमारतीच्या ढिगार्याखालून आज आणखी 30 मृतदेह बाहेर काढण्यात आले.
बांगलादेश दुर्घटनेतील मृतांचा आकडा ८०० वर
त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता 803 इतका झाला आहे. ढिगारा उपसण्याचे काम अजूनही चालूच असून त्याखाली आणखीही मृतदेह असण्याची शक्यता आहे. अवैधबांधकाम असलेली संबंधित इमारत 24 एप्रिलला कोसळली होती. या इमारतीसाठी पाच मजल्यांचीच परवानगी देण्यात आली होती. मात्र, अतिरिक्त तीन मजले अवैधपणे बांधण्यात आले होते.
