काँग‘ेसचं चांगभलं

कर्नाटकात काँग‘ेसला स्पष्ट बहुमत मिळाले. विजयाला अनेक बाप असतात पण पराभव पोरका असतो. तसे आता अनेक लोक विजयी काँग‘ेसला मोठे बहाद्दरीचे प्रमाणपत्र द्यायला लागले आहेत तर भाजपाला सल्ले. पण या निवडणुकीत काँग‘ेसने असा काय शेर मारला होता की त्याला एवढे स्पष्ट बहुमत मिळावे आणि भाजपाने असे काय पाप केले होते की त्यामुळे त्याचा पराभव व्हावा ? काँग‘ेसने एकच पराक‘म केला तो म्हणजे कोणाशीही युती न करता सगळ्या जागांवर उमेदवार उभे केले. भाजपाच्या मतांत फूट पडली. येडियुरप्पांनीही सर्व जागा लढवल्या होत्या आणि भाजपानेही आपले उमेदवार उभे केले होते. त्या सर्व मतदारसंघात भाजपाच्या मतांत पडलेल्या फुटीचा मानसिक आणि प्रत्यक्ष मतदानातला फायदा काँग‘ेसला झाला. यात येडियुरप्पा बाहेर पडले ही भाजपाची चूक झाली. त्याऐवजी पैसे खाणारे येडियुरप्पा भाजपात राहिले असते तर भाजपाचा काय विजय होणार होता का ? तसेही होणार नव्हते. एकंदरीत भाजपाची काही चूक नाही. चूक असलीच तर ती येडियुरप्पा यांची आहे. त्यांनी भ‘ष्टाचार केला ही ती चूक होय.

काँग‘ेसचा हा विजय साधासुधा नाही. त्याची दोन वैशिष्ट्ये आहेत. एक तर हा विजय भाजपाचा पराभव करून मिळवलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकसभेच्या 2014 सालच्या निवडणुका तोंडावर असतानाच हा विजय मिळाला आहे. आता या निवडणुकीला आत्मविश्‍वासाने सामोरे जाण्यास काँग‘ेसच्या नेत्यांना बळ मिळाले आहे. भाजपाने मागच्या म्हणजे 2008 च्या निवडणुकीत जिंकलेल्या जागांपैकी 71 जागा गमावल्या आहेत. पक्षाला मोठी पिछेहाट सहन करावी लागत आहे. जनता दल (से) हा पक्ष अजून शाबूत आहे. यावेळी निवडणुकी नंतर घेण्यात आलेल्या एक्झिट पोलमध्ये व्यक्त झालेले अंदाज खरे ठरले आहेत. काँग‘ेसला सत्ता मिळाली आहे. स्पष्ट बहुमत मिळाले आहे पण ते काठावरच आहे. बहुमताची बेरीज करण्यासाठी काँग‘ेसला कोणाशीही फारशी तडजोड करावी लागणार नाही हे खरे आहे पण काँग‘ेसने फार चांगले यश मिळवले आहे असे काही म्हणता येत नाही. गेल्या तीन वर्षात झालेल्या काही विधानसभा निवडणुकांपैकी उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीच्या बाजूने लाटच होती. तामिळनाडूत जयललिता यांनी उज्ज्वल यश मिळवले होते आणि बिहारमध्ये नितीशकुमार यांनी 80 टक्के जागा मिळवल्या होत्या.

त्या त्या राज्यातल्या जनतेने या तीन नेत्यांच्या बाजूने कौल देण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना भरभरून मते दिली तसे काही कर्नाटकात काँग‘ेसच्या बाजूने झाले नाही. लोकांनी भाजपाला हटवले आहे पण काँग‘ेसला काही फार भरघोस जागा दिलेल्या नाहीत. काँग‘ेसची फार मोठी सरशी झालेली नाही. या निवडणुकीवर राष्ट्रीय प्रश्‍नांचा काही परिणाम झालेला नाही. तिथल्या जनतेने आपल्या रोजच्या जीवनातल्या आणि राज्यांच्या अखत्यारीत असलेल्या विषयांना प‘ाधान्य दिले. प्रशासन आणि सामान्य नागरी समस्या यांचा प्रभाव या निवडणुकीतल्या मतदारांवर दिसून आला. या निवडणुकीत काँग‘ेसचा विजय झाला असल्यामुळे तो राहुल गांधी यांचाच विजय आहे असे म्हणण्याची स्पर्धा काँग‘ेसजनांत लागली आहे. तिच्यात पंतप्रधान मनमोहनसिंग हेच आघाडीवर आहेत. कोणी का असेना पण या निवडणुकीत राहुल गांधी यांचा कसलाही प्रभाव पडलेला नाही. त्यांनी या निवडणुकीच्या प्रचाराला कमी वेळ दिला होता. हा त्यांचा विजय नाही तसाच या निवडणुकीत नरेन्द्र मोदी यांचाही प्रभाव पडलेला नाही. त्यांनीही प्रचाराला फार वेळ दिला नव्हता पण त्यांनी ज्या भागांना भेटी दिल्या त्या भागांत भाजपाला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. त्यांना राष्ट्रीय नेता होण्या साठी अजून किती प्रवास करायचा आहे याची जाणीव या निवडणुकीत झाली आहे.

या निवडणुकीतराष्ट्रीय नेते, राष्ट्रीय प्रश्‍न यातल्या कशाचाहीि चांगला किंवा वाईट प्रभाव पडलेला नसल्याने या निकालावरून लोकसभेच्या निवडणुकीचे काही अंदाज बांधणे सयुक्तिक होणार नाही. परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांनी भाजपाच्या पराभवाचे वृत्त ऐकताच, ‘देअर इज नो मोदी,’ असे म्हटले पण यातही फार मोठे सत्य नाही. कारण याच तर्‍हेने उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीतील काँग‘ेसच्या पराभवानंतर, देअर इज नो राहुल गांधी असे म्हणता आले असते. विजय मिळताच राहुल गांधी यांना श्रेय देऊन त्यांची मर्जी संपादन करणारांपैकी ते आहेत. भारतीय जनता पार्टीचा या निवडणुकीतला पराभव वाईट आहे. या पक्षाचे उमेदवार आणि उपमु‘यमंत्री के.एस. ईश्‍वरप्पा हे आपल्या शिमोगा मतदारसंघात पराभूत झाले आहेत. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या पक्षाचे दक्षिण कर्नाटकातले स्थान आहे तसेच राहिले आहे. या चौरंगी लढतीतला चौथा कोन म्हणजे येडियुरप्पा हा कोन हास्यास्पद ठरला आहे. पक्षातून बाहेर पडून त्यांनी नेमके काय साधले असा प्रश्‍न आता त्यांना स्वत:लाच विचारावा लागणार आहे.

Leave a Comment