मुंबईत इंडियन्सच राजे

मुंबई- आयपीएल-6मध्ये मंगळवारी झालेल्या साखळी सामन्यात मुंबई इंडियन्सनेकोलकाता नाइट रायडर्सवर 65 धावांनी विजय मिळवला. सलामीवीर सचिनतेंडुलकर, दिनेश कार्तिक आणि स्मिथ यांच्या फलंदाजीच्या जोरावर मुंबईइंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स समोर विजयासाठी171 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र मुंबईच्या गोलंदाजांपुढे कोलकाताचासंघ 105 धावांत बाद झाला.

त्याआधी, मुंबईने वीस षटकात सहा विकेटच्या मोबदल्यात 170 धावा केल्या.सचिन तेंडुलकरने ट्वेंटी-ट्वेंटीला साजेशी फलंदाजी करताना 28 चेंडूत 48धावा जमवल्या. यात त्याने आठ चौकार लगावले. भाटियाने त्याच्या यष्टयावाकवल्या. हाणामारीच्या षटकात दिनेश कार्तिकने 18 चेंडूत नाबाद 34 धावांची खेळी केली.कार्तिकने तीन चौकार आणि दोन षटकार लगावले.स्मिथने 47 धावांची खेळी केली पण त्यासाठी त्याने 53 चेंडू घेतले. रोहितशर्मा, किरॉन पोलार्ड आज विशेष चमक दाखवू शकले नाहीत. मॅक्लरेन कोलकाताचा
सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने दोन बळी घेतले मात्र त्याच्या चारषटकात 60 धावा वसूल केल्या.

विजयासाठी 171 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात आलेल्या कोलकाताला पहिल्याचषटकात प्रग्याण ओझाने मोठा धक्का दिला. त्याने कर्णधार गौतम गंभीरलाशून्यावर बाद केले. त्यानंतर कोलकाताचे फलंदाज ठरावीक टप्प्याने बाद होतगेले. कोलकाताकडून ज्याक कॅलिसने सर्वाधीक 24 धावा केल्या.मुंबईकडून हरभजन सिंगने तीन गडी बाद केले. तर प्रग्यान ओझा आणि मचेल
जॉन्सनने प्रत्येकी दोन गडी बाद केले.[