धान्य साठवण व वाह्तुकिला उपयोगी ठरणारे व्हाल्व्ह बनविणारी जर्मनीची सामसन कंट्रोल्स कंपनी पुण्यात

पुणे दि ८ : अन्नधान्य , वायू , पेट्रो रसायने , दुग्ध व्यवसाय वाह्तुकिस अनेक क्षेत्रात उपयोगी ठरणारे व्हाल्व्ह बनविणारी जर्मनीची सामसन कंट्रोल्स कंपनी पुण्याजवळील रांजणगाव येथे ७ १ कोटी रुपये खर्चून आणखी एक प्रकल्प उभारण्याचे ठरविले आहे अशी माहिती व्यवस्थापकीय अन्चालक अतुल राजे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
याशिवाय मगरपट्टा येथे प्रकल्प संरचना कार्यालय सुरु केले जाणार आहे असे नमूद करून श्री राजे पुढे म्हणाले की दिल्ली, कोलकता बडोदा मुंबई हैदराबाद बंगलोर, चेन्नई येथे कंपनीची विक्री कार्यालये आहेत. भारताची बाजारपेठ प्रमाणात वाढते आहे त्याचा फायदा घेता यावा यासाठी आम्ही प्रकल्प विस्तार करत आहोत. आता पर्यंत आम्ही१ ४ २ कोटी रुपये गेल्या तीन वर्षात गुंतविले आहेत.

नव्या प्रकल्पात सर्व यंत्रणा अत्याधुनिक असतील. भारताबाहेरील प्रकल्पांच्या तुलनेत येथील उत्पादन खर्च अधिक असला तरी भविष्यात वाढणारी बाजारपेठ लक्षात घेता आम्हाला चांगलि संधी मिळेल याची खात्री आहे ज र्मनीतील नव्या प्रक्रिया आणि यंत्रणाही आम्ही येथे राबविणार आहोत. सध्या वर्षाला दहा हजार व्हाल्व्ह निर्मितीची क्षमता असून तीत जरुरीनुसार वाढ केली जाणार आहे श्रीलंका , बां गला देश येथे आम्ही निर्यात करत असलो तरी मुख्य भर देशातील बाजार पेठेवरच राहणार आहे. रिलायन्स , बायर , लार्सन – टुब्रो, सिमेन्स अशा बहुराष्ट्रीय कंपन्या आमच्या ग्राहक आहेत.

स्थानिक बाजारपेठेसाठी सर्व प्रकारच्या तापमान आणि दाबाखाली उत्तम काम करू शकतील असे व्हाल्व्ह कंपनी तयार करते असे नमूद करून ते म्हणाले की भारतातील बाजारपेठ ३ ० – ३ ५ दराने वाढते आहे. मात्र केंद्र सरकारने वायू विषयक धोरणात सातत्य ठेवणे गरजेचे आहे. राजकीय मतभेदामुळे असे धोरण आखण्यात अडथळा येतो आहे . यावेळी कंपनीच्या संचालक मंडळाचे चे सदस्य इंगो कोच हेही उपस्थित होते.
……………….
फोटो ओळी
सामसन कंट्रोल कंपनीचे संचालक इंगो कोच आणि व्यवस्थापकीय संचालक अतुल राजे