येडियुरप्पांचा आत्मा शांत…..

भारतीय जनता पार्टीचे माजी मु‘यमंत्री बी.एस. येडियुरप्पा हे विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत. त्यांना इतक्या दारुण पराभवाला तोंड द्यावे लागले आहे की, येत्या काही वर्षात ते राजकारणातले आपले अस्तित्व तरी टिकवू शकतील की नाही याविषयी शंका आहे. ते बुडले आहेत पण आपल्यासोबत पक्षालाही घेऊन बुडले आहेत. जगातल्या विघ्नसंतोषी लोकांचा असाच प्रकार असतो. ते कोणाच्या तरी द्वेषाने किंवा हेकेखोरपणामुळे असे काही पछाडलेले असतात की ते इतरांचे नुकसान करतात आणि तसे करताना आपलेही घर जळत आहे याची त्यांना कसलीही पर्वा नसते. त्यांच्या या विघ्नसंतोषी पणामुळे काँगे‘ेसला मात्र लॉटरी लागली. गेल्या काही महिन्यांपासून काँग‘ेस पक्षात असलेले नैराश्याचे वातावरण बदलून गेले. पक्षावर एकामागे एक भ‘ष्टाचाराचे आरोप होत होते. 2014 साली होणार असलेल्या लोकसभा निवडणुकी विषयी पक्षात बरीच चलबिचल होती पण कर्नाटकात पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्याने पक्षात आत्मविश्‍वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. कर्नाटकात भाजपाचा पराभव ठरलेला होता पण काँग‘ेसला स्पष्ट बहुमत मिळते की काठावरचे बहुमत मिळते या बाबत शंका होती. ती खोटी ठरली आहे आणि पक्षाला मिळालेले बहुमत स्पष्ट आहे.

या विजयाला भाजपातल्या भांडणाचा चांगलाच हातभार लागला आहे. विशेषत: माजी मु‘यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या नकारात्मक भूमिकेचा चांगलाच फायदा झाला आहे. येडियुरप्पा हे मोठे धर्मभोळे आणि सनातनी आहेत. ते मठातल्या महाराजांच्या आणि स्वामींच्या आशीर्वादावर फार अवलंबून असतात. त्यांना कोणत्या मठाच्या स्वामींनी पक्ष फोडण्याचा सल्ला दिला होता हे काही माहीत नाही पण, पक्ष फोडल्याने भाजपाचा पराभव होणार आणि आपण किंगमेकर होणार ही त्यांची अपेक्षा फोल ठरली आहे. कर्नाटकातल्या विधानसभा निवडणुकीचा खरा अजेंडा येडियुरप्पा हाच होता. त्यांना त्यांचा भ‘ष्टाचार मान्य होता. मान्य न करून कोणाला सांगता ? त्यांना अटकही झाली होती आणि एक रात्र गजाआड काढावी लागली होती. असे आपले पराक‘म असतानाही भाजपाने आपल्याला सांभाळून घ्यायला हवे होते असा त्यांचा आग‘ह होता. काँग‘ेसचे नेते आपल्या भ‘ष्ट मंत्र्यांना सांभाळून घेतात. सारा पक्ष त्यांच्या समर्थनार्थ त्यांच्या मागे उभा राहतो तसे भाजपा नेत्यांनी का करू नये अशी त्यांची विचारणा असे. भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी हे मात्र येडियुरप्पा यांना मु‘यमंत्रि पदावरून हटवावे अशा ठाम मताचे होते.

पक्षाने आपल्या स्वच्छ प्रतिमेसाठी येडियुरप्पा यांना पदावरून हटवले पण ते त्यामुळे भलतेच चवताळले. त्यांनी पक्षाच्या बाहेर पडून नवा पक्ष स्थापन केला. आपला लिंगायत समाज आपल्या मागे उभा राहिला तर आपण 40-42 जागा मिळवू. भाजपाचा तर पराभवच होईल. असे त्यांचे अंदाज होते. त्यातला निम्मा अंदाज खरा ठरला. भाजपाचा पराभव होऊन हातातले सरकार गेले. पण येडियुरप्पा यांचा काँग‘ेसला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याने त्यांना आपलीच मदत घेणे भाग पडेल हा त्यांचा अंदाज सपशेल फसला. येडियुरप्पा आणि भाजपा यांच्या संघर्षात भाजपाचा पराभव झाल्याने येडियुरप्पा यांचे अर्मान पुरे झाले पण त्यांना स्वत:ला दहाही जागा मिळाल्या नाहीत. काँग‘ेसला स्पष्ट बहुमत मिळाले. येडियुरप्पा यांनी भाजपाची पिछेहाट घडवण्यात यश मिळवले पण त्यासाठी आपल्या स्वत:च्या राजकीय अस्तित्वावरच भले मोठे प्रश्‍नचिन्ह निर्माण करून ठेवले. कर्नाटकातली भारतीय जनता पार्टी आपल्यामुळेच आहे हा त्यांचा दावा फोल ठरला. भारतीय जनता पार्टीला सत्तेवर आणण्यासाठी येडियुरप्पा यांनी परिश्रम केले होते हे नि:संशय होते. ते स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याच्या वल्गना करीत असत तेव्हा त्यांना ही गोष्ट लक्षात आणून दिली जात असे की, कर्नाटकात भाजपाची स्वत:ची अशी ताकद आहे, तिला येडियुरप्पा यांचे नेतृत्व मिळाले आहे म्हणून पक्ष सत्तेवर आला आहे.

याचा अर्थ येडियुरप्पा यांच्याविना पक्षाला काही अस्तित्व नाही ही त्यांची बढाई आहे. आता वस्तुस्थिती लक्षात आली आहे की, कर्नाटकात येडियुरप्पा यांच्याविना भाजपा आहे पण भाजपाविना येडियुरप्पा यांना काहीच किंमत नाही. पक्षात आणि संघटनेत 50 वर्षे काढूनही अशा आत्मकेंन्द्रित लोकांना आपले पक्षात नेमके स्थान काय हेच जर नीट कळत नसेल तर त्यांच्या आकलन क्षमतेला सलाम करावा लागेल. आता भाजपाचाही पराभव झाला आणि येडियुरप्पा यांनाही शिक्षा झाली. निदान आता तरी त्यांना आपण नेमके कोण आहोत हे समजेल अशी अपेक्षा करू या. या निवडणुकीत काँग‘ेसच्या नेत्यांना स्पष्ट बहुमताचा आनंद होणे स्वाभाविक आहे. कारण अनेक मोठ्या पराभवानंतर काँग‘ेसला एखाद्या मोठ्या राज्यात अशी सत्ता मिळाली आहे. उत्तर प्रदेश, तामिळनाडू आणि बिहार मध्ये पराभव झाला होता. आता या विजयाचे श्रेय राहुल गांधी यांना देण्यास काँग‘ेसचे नेते पुढे सरसावले आहेत. पण तसे म्हणणे ही चापलुशी आहे. राहुल गांधी यांचा या विजयात कसलाही वाटा नाही.

Leave a Comment