…तर पीडब्ल्यूडीच्या मंत्र्याकडे किती संपत्ती?

मुंबई, दि.7- नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लाचखोर अभियंता सतीश चिखलीकर याच्या संपत्तीच्या सुरस कहाण्यांनी केवळ सामान्यांनाच नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही आश्‍चर्यचकित
केले आहे. पण, राज ठाकरे यांना मात्र या कहाण्या ऐकल्यानंतर वेगळाच प्रश्‍न पडला आहे. मुंबईत आज झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी लाचखोर अभियंता सतीश चिखलीकरच्या बेहिशेबी संपत्तीवरून थेट भुजबळांवरच शरसंधान साधले.

ते पुढे म्हणाले, एका पीडब्लूडीच्या इंजिनिअरकडे एवढी संपत्ती असेल तरपीडब्लूडीच्या मंत्र्याकडे किती संपत्ती असेल? असा प्रश्‍न राज ठाकरेयांना पडला आहे. आपल्या विशेष शैलीत त्यांनी तो पत्रकारांसमोरही तेवढ्याचखुबीने मांडला. आपल्याला शाळेतील गणितात प्रश्‍न असतात ना की, एक डझन
आंब्यांना अमुक अमुक पैसे लागतात तर …आंब्यांना किती पैसे… तसाचरश्‍न आहे की एका पीडब्लूडीच्या इंजिनिअरकडे एवढी संपत्ती असेल तरपीडब्लूडीच्या मंत्र्याकडे किती संपत्ती असेल? असे साधे-सोपे गणित मांडतमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षरीत्या सार्वजनिक बांधकाम मंत्रीछगन भुजबळ यांना टोला लगावला आहे.

यावेळी इंजिनिअरच्या संपत्तीचे आकडे ऐकून धक्का बसल्याचेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

Leave a Comment