आयआरबीकडून टोलवसुलीची सर्व तयारी पूर्ण!

कोल्हापूर- कोल्हापुरात आआरबीकडून टोलवसुली केली जाणारयावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिक्कामोर्तब केले. त्यानंतर आज आयआरबीने टोलवसुलीची सर्व तयारी पूर्ण केली आहे. टोल प्लाझावरतीआवश्यक साहित्यासह कामगारांची संख्या ही वाढवण्यात आली आहे. त्यामुळे टोलविरोधातील संघर्ष अधिक पेटणार असल्याचे चिन्हे दिसत आहेत.

कोल्हापूर शहरात बांधा, वापरा व हस्तांतरित करा, या तत्त्वावर आयआरबी कंपनीच्या वतीने रस्ते प्रकल्प राबविण्यात आला आहे. शहरात 2009 पासून
रस्ते विकास प्रकल्पांतर्गत 220 कोटी रुपये खर्चाच्या 49.90 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. शहरांतर्गत राबविण्यात
आलेल्या 220 कोटींच्या रस्ते विकास प्रकल्पाच्या मोबदल्यात शहरात तीस वर्षांसाठी टोलवसुली केली जाणार आहे; परंतु टोलला सुरुवातीपासून विरोध
होऊ लागल्याने राज्य शासनाच्या नगरविकास खात्याने त्याला स्थगिती दिली होती.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पाच्या ठेकेदार आयआरबी कंपनीला टोल वसुली करण्याच्या अध्यादेशावर सही करून
टोलवसुलीला दिलेली स्थगिती उठवली आहे. त्यामुळे कंपनीचा टोलवसुलीचा मार्ग मोकळा झाला आहे. टोलवसुलीच्या विरोधात 1 मे कोल्हापुरात बंद पाळण्यात आला होता. तर सर्व वाहतूक संघटनांच्या वतीने शहरातील प्रमुख मार्गावर चक्काजाम आंदोलन केले होते. याला शहरातील नागरिकांनीही उत्स्फूर्त पाठिंबा दिला होता. आज आयआरबीने टोलवसुलीची सर्व तयारी पूर्ण केली आहे. टोलनाक्यावर पोलिसांची जादा कुमक ही देण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे टोल विरोधात प्रशासन विरुद्ध जनता असा संघर्ष पेटणार
हे निश्‍चित आहे.

Leave a Comment