पुणे, दि. ८ (प्रतिनिधी) -ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांना आज ज्येष्ठ अभिनेते डॉ श्रीराम लागू यांच्या हस्ते राम डवरी स्मृती कला गौरव पुरस्कार मंगळवारी प्रदान करण्यात येणार होता. मात्र कार्यक्रमा दरम्यान डॉ. लागु यांना अचानक अस्वस्थ वाटु लागले. संयोजक मात्र पुरस्कार वितरीत करण्याची विनंती करत होते त्यावर डॉ. लाग यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर संयोजकांनी त्यांना घरी सोडले.
डॉ लागू यांना अस्वस्थ वाटू लागल्याने मैदानातच झाले पुरस्कार वितरण
सायंकाळी पाचच्या सुमारास मनोहर मंगल कार्यालयात कार्यक्रमाला सूरूवात झाली. राम डवरी यांच्यावरील चित्रफितीचे प्रसारण सुरू असताना डॉ. लागू यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते एकटेच सभागृहाबाहेर आले. संयोजकांनी त्यांना सभागृहात येण्याची विनंती केली त्यावर त्यांनी अस्वस्थ वाटत असल्याचे सांगीतले त्या नंतरही संयोजकांनी पुरस्कराचे वितरण करण्यसाठी त्यांच्याकडे आग्रह धरला यावर डॉ. लागू यांनी नाराजी व्यक्त केली, सभागृहाबाहेर या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यानंतर संयोजकांनी त्यांना घरी सोडले.
पुरस्कारला उत्तर देताना राजदत्त म्हणाले, राम डवरी यांच्या नावाचा पुरस्कार मला विशेष भावला आहे. डवरी यांनी तरूणांपुढे आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी जिद्दीने स्वःतला घडविले, निर्माता होण्यासाठी त्यांनी स्वःतचे वेगळेपण सिद्ध केले.
छायाचित्राच्या ओळी: डॉ श्रीराम लागू यांना अस्वस्थ वाटू लागल्याने राम डवरी पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात ते कार्यक्रमातून एकटेच निघू लागले तेंव्हा संयोजकांनी घाईघाईने बाहेर मैदानातच पुरस्कारवितरणाचा कार्यक्रम केला त्यावेळीही डॉ लागू अतिशय अस्वस्थ दिसत होते.
