सनीशी तुलना करू नका- वीना

अभिनेत्री सनी लियोन, शर्लिन चोपड़ा, पूनम पांडे यांच्या सोबत जर वीना मलिकचे नाव कोण घेतले तर ती लगेचच नाराज होते. काही दिवसापूर्वीच तिचा एक इंटरव्यू घेण्यात आला. त्यामध्ये वीणाचे नाव पोर्न स्टार असलेल्या सनी लियोन सोबत घेण्यात आले. त्यामुळे वीणा थोडीसी चिडली होती. प्रेक्षकांना तिच्या आणि माझ्या अभिनयातील तुलना करावयास हवी असे तिने स्पष्ट केले.

वीना मलिक सध्या आगामी काळात येत असलेल्या ‘जिंदगी ५०-५०’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा २४ मे रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमात वीनाने एक आयटम सॉंग केले आहे. सध्या ती दक्षिण भारतीय सिनेमात देखील काम करीत आहे. त्यामुळेच तिने आता बॉलीवुडमधील भूमिका सुद्धा गांभीर्याने करीत आहे.

तसे पहिले तर वीनाला सिनेइंडस्ट्रीत काम करीत असताना अनेक अडचणी येतात.पाकिस्तानहून आल्यामुळे काही प्रमाणत तिचे नुकसान होत आहे. सरबजीत प्रकरणात तिने एक टिप्पणी केली होती. त्यामुळे काही जननी तिच्यावर कमेंट्स केल्या होत्या. ‘जिंदगी ५०-५०’ या सिनेमात वीनाने एका वेश्याचा रोल केला असून या सिनेमात तिने अनेक हॉट सीन दिले आहेत.

Leave a Comment