लंडनमध्ये वांग्यात दिसले श्रीगणेश !! दर्शनासाठी श्रद्धाळू भाविकांची गर्दी

लंडन- श्रद्धा आणि अंधश्रद्धा या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्या तरी त्यांची उदाहरणे या जगात अनेक ठिकाणी पाहावयास मिळत आहेत.अशिक्षितांबरोबरच सुशिक्षितही या अंधश्रद्धेवर डोळे झाकून विश्‍वास ठेवतात. त्याप्रमाणे अविकसीत राष्ट्रांप्रमाणे विकसीत राष्ट्रातही अशा घटना घडताना दिसत आहेत. लंडनमधील एका शहरातील हिंदू नागरिक सध्या एका वांग्याच्या पूजेसाठी गर्दी करत असल्याचे चित्र दिसत आहे.

ब्रिटनमधील लिसेस्टरमध्ये राहणारे हिंदू या दिवसामध्ये एका वांग्याची पूजा करण्यात मग्न आहेत. कारण त्यांचा असा विश्‍वास आहे की, त्या वांग्यामध्ये बाप्पा गणपती आहेत. तेथे एका भारतीयाने एक साधे मंदिर उभारले आहे. ज्यामध्ये हिंदूची अफाट श्रद्धा असणारा श्री गणेशाचा आकारत्या फळांनी बनविलेल्या मूर्तीमध्ये दिसत असल्याचे सांगण्यात आले आहे.61 वर्षांच्या प्रफुल्ल यांनी भाज्यांच्या एका पेटीमधून ते वांगे शोधून काढले आणि त्यांनी अभिमानाने ते वांगे एका खोलीत ठेवले आहे. तसेच त्यांनी एक तात्पुरत्या स्वरुपाचे मंदिरही बनविले आहे. त्यामुळे याठिकाणी त्या परिसरातील नागरिकांची या वांग्याची पूजा करण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे.

अशी माहिती ब्रिटीश वृत्तपत्र द सन यामधून प्रसिद्ध केली आहे. द सन या वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रफुल्ल यांनी सांगितले आहे की, त्या पेटीतील हे श्री गणेशासारखे दिसणारे वांगे सर्वप्रथम माझ्या पत्नीने पाहिले, आणि सांगितले की ते हुबेहुब श्री गणेशासारखे दिसत आहे. त्यानंतर ते आम्ही घरी आणले व त्यासाठी एक खास मंदिर तयार केले. तसेच ते म्हणाले की, हा माझ्यासाठी व माझ्या कुटुंबासाठी गणेशजींचा आशीर्वाद आहे. हे आमच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी घेऊन येतील.
प्रत्येक व्यक्तीची तो हिंदू, मुस्लीम किंवा अन्य कोणत्याही धर्माचा-जातीचा असो, त्याची कोणावर ना कोणावर श्रद्धा असते. परंतु, ही श्रद्धा ठेवताना आपण अंधश्रद्धेचा बळी ठरणार नाही याची काळजीही घेणे गरजेचे आहे.