प्रशांत दामले यांना यावर्षीचा ‘परशुराम पुरस्कार ’

पुणे, दि. 6 (प्रतिनिधी) – महाराष्ट्र चित्पावन संघातर्फे 12 मे रोजी भगवान श्री परशुराम जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे. या उत्सवानिमित्त यावर्षीचा ‘परशुराम पुरस्कार कलाक्षेत्रात अतुलनीय योगदान देणारे प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांना जाहीर करण्यात आला आहे.

महाराष्ट्र चित्पावन संघाचे अध्यक्ष मा.डॉ.मुकुंदराव अभ्यंकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. अकरा हजार रूपये, मानपत्र आणि पुणेरी पगडी असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त प्रशांत दामले यांचा कलाप्रवास रसिकांना अनुभवता येणार आहे. राजेश दामले ही मुलाखत घेणार असल्याचे महाराष्ट्र चित्पावन संघातर्फे पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. तसेच यावेळी अतुल थिएटर निर्मित ‘अभंगरंग लावण्यसंगम हा सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक‘म रसिकांसाठी आयोजित करण्यात आला आहे. चैतन्य कुलकर्णी, अंजली दाते आणि धनश्री लेले आदी कलाकार हा कार्यक‘म सादर करणार आहेत. 12 मे संध्याकाळी आठ वाजता पेरूगेट भावे स्कूल येथे हा कार्यम‘म होणार असल्याचे संयोजकांनी कळविले आहे.