नवी दिल्ली, दि.४ – चीनने भारतीय प्रदेशात घुसखोरी केल्यावरून समाजवादी पक्षाने केंद्र सरकारला धारेवर धरल्याच्या पार्श्वतभूमीवर परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी काल या पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंग यादव यांची भेट घेतली. चीनच्या घुसखोरीबद्दल सरकारची भूमिका आणि धोरण यांची माहिती त्यांनी मुलायमसिंग यांना दिली. संसद भवनात झालेल्या या भेटीदरम्यान पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री व्ही. नारायणसामी हेही उपस्थित होते.
चीन घुसखोरी – खुर्शीद भेटले मुलायमसिंगांना
या भेटीदरम्यान लडाखमधील चीनच्या घुसखोरीबाबत सरकारच्या भूमिकेची तसेच, या घुसखोरीचा सामना करण्यासाठी सरकारच्या धोरणांचीही खुर्शीद यांनी कल्पना दिली. ४० मिनिटांच्या या भेटीदरम्यान पाकीस्तानात मृत्युमुखी पडलेला भारतीय कैदी सरबजितसिंगचा मुद्दाही उपस्थित झाला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
आता सरकार या विषयाबाबत काहीसे गांभीर्य दाखवत आहे. मात्र, हा विषय अतिशय गंभीर असून चीनला आपल्या भूमीवरून हाकलून लावण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया मुलायमसिंग यांनी दिली. त्यांनी खुर्शीद यांना चीनवर विश्वांस ठेवला जावू शकत नाही,असेही सांगितले.
या घुसखोरीवरून केंद्रावर जोरदार टीका करताना सरकार भेकडपणाने वागत असल्याचा हल्ला समाजवादी पक्षाने चढविला होता. खुर्शीद यांच्या चीन दौर्यालाही पक्षाने विरोध दर्शविला होता. श्रीलंकेतील तामिळींच्या प्रश्ना्वरून डीएमकेने केंद्रातील सत्ताधारी युपीएचा पाठिंबा काढल्याने आता त्यांची मदार बाहेरुन पाठिंबा देणार्या समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षावरच आहे.
