
नवी दिल्ली, दि. ३ – संसदेवरील दहशतवादी हल्ल्यातील अतिरेकी अफजल गुरूच्या फाशीच्या निषेधार्थ काश्मिरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला दिल्लीत ४८ तासांचे उपोषण करण्यास शहर पोलीसांनी परवानगी नाकारली आहे. मलिक आजपासून जंतरमंतर येथे हे उपोषण करणार होता. या उपोषणाला परवानगी नाकारल्याच्या वृत्ताला दिल्लीचे पोलीस आयुक्त नीरज कुमार यांनीही दुजोरा दिला आहे. मलिक याला अटक करून जेट एअर वेज च्या विमानाने काश्मीरला रवाना करण्यात आले आहे असेही समजते.
