वांद्रे टर्मिनसवर मुलीवर अॅसिड हल्ला

मुंबई, दि. 3 – वांद्रे टर्मिनस येथे गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने एका मुलीवर अॅ्सिड हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात बाजुला अॅपसिड उडाल्याने या मुलीसह अन्य दोनजण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना येथील भाभा रुग्णालयात दाखल केले आहे. चेहर्‍यावर रुमाल बांधून अज्ञात व्यक्तीने या मुलीचा पाठलाग केला आणि तिच्यावर अॅ्सिड हल्ला करुन तो पसार झाला. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ही तरुणी कुटुंबासोबत गरिबरथ ट्रेनमधून उतरत असताना अज्ञाताने हल्ला केला. अॅयसिडचे शिंतोडे आजूबाजूच्या लोकांच्या तोंडावर पडल्याने यात इतर पाच जण जखमी झाले आहेत. जखमींवर भायखळा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.हल्ल्यात तरुणी आणि तिची मावशी भाजल्या असून त्यांना भायखळ्याच्या मसीना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हल्ल्यानंतर मुलीचा चेहरा मोठ्या प्रमाणावर भाजल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. तिचा डावा डोळा निकामी झाला असल्याचे डॉक्टर म्हणाले.

एकतर्फी प्रेम या अॅझसिड हल्ल्यामागचं कारण असू शकतं, असा रेल्वे पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मुलीच्या साक्षीनंतरच महत्त्वाचे पुरावे हाती लागतील असंही पोलिसांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर प्लॅटफॉर्मवर सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याने हल्लेखोराला शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.

Leave a Comment