
नवी दिल्ली दि.२ – सोन्याची नाणी, दागिने वा अन्य वस्तू रोखीने खरेदी करत असाल आणि ही खरेदी दोन लाख रूपयांपेक्षा अधिकची असेल तर त्यावर १ जूनपासून १ टक्का टीसीएस ( टॅक्स कलेक्शन अॅक्ट) लागू होत आहे. त्यामुळे यापुढे दोन लाखांपेक्षा जास्त किंमतीची रोख सोने खरेदी महाग पडणार आहे. पाच लाख रूपयांपेक्षा जास्त किमतीच्या दागिन्यांवरही हा कर १ टक्का आकारला जाणार आहे.२०१३ च्या अर्थसंकल्पात हा कर लावला गेला आहे.
