कैट करणार नाही ऐक्शन सीन

येत्या काळात येत असलेल्या ‘धूम-३’ या सिनेमात अभिनेत्री कैटरीना कैफ हेवी ऐक्शन सीन करणार नसल्याचे समजते. असे सीन करीत असतना ती जर जखमी झाली तर सिनेमाचे शूटिंग शेड्यूल बिघडणार आहे. अभिनेत्री कटरीना कैफ जरी नाजुक दिसत असली तरी यापूर्वी तिने स्क्रीनवर ऐक्शन सीन केले आहेत. ‘एक था टाइगर’ या सिनेमात तिने स्टंट केले आहेत. ‘जिंदगी न मिलेगी दोबारा’ या सिनेमामध्ये बाइकसोबत तिने ऐक्शन आणि स्टाइलिश सीन केला आहे.

आगामी काळात येत असलेल्या ‘धूम -३’ या सिनेमात कैटच्या वाटणीला काही हाय-ऐक्शन सीन आले आहेत. आतापर्यतचा अनुभव पाहता ती स्वता परफॉर्म करेल असे वाटत होते. मात्र तिने हे ऐक्शन सीन स्वता करण्याऐवजी बॉडी डबल यूज केला आहे.

त्याचे खरे कारण कैटचे दूसरे सिनेमे आहेत. तिच्या कडे सध्या दोन मोठे सिनेमे आहेत. त्यामध्ये सध्या ती खूपच व्यस्त आहे. तिच्याकडे ‘धूम-३’ आणि ‘बैंग बैंग’ हे दोन सिनेमे आहेत. त्यामुळे हेवी ऐक्शन सीन शूट करण्याच्या नादात जर ती जखमी झाली तर दोन्ही सिनेमाचे शूटिंग लटकणार आहे. त्यामुळेच तिने ‘धूम-३’ या सिनेमात एक्रोबैटिक्स आणि लाइट ऐक्शन सीन करण्याचे ठरविले आहे. कैटरीना- आमिर खानसोबत ऐक्शन सीनची प्रैक्टिस करीत असल्याची चर्चा होती मात्र फायनली ती परफॉर्म करणार नसल्याचे समजते.

Leave a Comment