ई टीव्ही मराठीवर सहा मेपासून सुरू होणा-या कोण होईल मराठी करोडपती’
क्विझ शो सूरू होत आहे. अमिताभ बच्चन यांना या शोमध्ये आणणे ही अप्रतिम
कल्पना असून त्यांना बोलावण्याचा नक्कीच विचार करू. मात्र, त्यांना सेटवर
आणले तर माझ्या तोंडून त्या वेळी कोणतेही शब्द फुटणार नाहीत किंवा त्या
वेळेस काय होईल मी सांगू शकत नाही. त्यांच्याकडून सर्वसमावेशक अभिनय,
वाचन, लिखाण व मेहनत या गोष्टी मला बारकाईने घेण्यासारख्या आहेत अशी
भावना अभिनेता सचिन खेडेकर यांनी व्यक्त केली.
बच्चन सेटवर आले तर मी अबोल होईल – सचिन खेडेकर
या वेळी व्हायकेम 18 प्रायव्हेट लिमिटेडचे रिजनल बिझनेस हेड अनुज पोतदार
व ई-टीव्ही मराठीचे नॉन फ्किशन हेड अमित फालके व सिद्धार्थ बासू उपस्थित
होते. सचिन म्हणाला, नितीन देसाई यांनी करोडपतीच्या सेटची उभारणी केली
असून या कार्यक्रमाच्या रूपाने मोठे शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला
आहे.
अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ही मालिका कशी सादर करावी याबाबत माहिती
दिली असून त्यानुसार मी काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. या मालिकेत
राज्यातील इतिहास, भूगोल, क्रीडा, नागरिकशास्त्र, साहित्य लोकांपर्यंत
पोहोचवून लोकांना आपल्या संस्कृतीची ओळख करून देणार आहे.फालके म्हणाले,
मराठी माणसाच्या आयुष्यात या माध्यमातून थोडाफार बदल घडवण्याचा आम्ही
प्रयत्न करणार आहोत. संपूर्ण कुटुंबाचे मनोरंजन करणारा हा कार्यक्रम आहे.
मालिकेसाठी देशभरातील मराठी प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.
चित्रपट व नाटकात काम करताना अनेक मालिकांसाठी मला विचारणा करण्यात आली,
परंतु कुटुंबाने पाहावी व माझ्या मनास आनंद देईल अशी मालिका भेटत
नव्हती. ई. टीव्हीवर सहा मेपासून सुरू होणा-या कोण होईल मराठी करोडपती’
या मालिकेच्या रूपाने मला 12 वर्षांनंतर मनासारखी मालिका मिळाल्याची
भावना खेडेकर यानी यक्त केली
