पुणे, दि. 28 (प्रतिनिधी) -सध्या देशात ठिकठिकाणी झालेल्या मुलीवरील अत्याचाराबाबत जे बोललो त्याचा प्रसारमाध्यमांनी चुकीचा अर्थ काढला. यांचा संबंध अक्षराशी आहे त्यांनी राक्षस होणे योग्य नाही, असे आज केंद्रीय गृहमत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज येथे बोलून दाखविले.
दैनिक ‘केसरीमच्या हिंदी आवृत्तीचे अनावरण आज शिंदे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. वनमत्री पतंगराव कदम, आमदार दीप्ती चवधरी, केसरीचे संपादक दीपक टिळक, रोहित टिळक आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
आपल्या बोलण्याचां चुकीचा अर्थ काढल्याची वेदना – सुशीलकुमार शिंदे
लेखनीत ताकद आहे. हेच कारण होते की दिल्लीमध्ये झालेल्या घटनेनंतर संपूर्ण भारत देश जागा झाला. याची दखल घेत एका महिन्यात सरकारला कठोर कायदा करणे भाग पडले. पण कायदा करून काय मरक पडला आहे का? आज देशातील कोणत्याही राज्याकडे पहा तेथे बलात्कार होत आहेत. या सगळ्याच घटनांचा विचार केला पाहिजे गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे, हे आपले संसदेतील भाषण आहे. त्याचा अत्यंत चुकीचा अर्थ काढून विपर्यस्त माहिती प्रसारीत केली गेली, असे शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.
आमच्याही चुका होतात. ज्या ज्या वेळी या चुका झाल्या. त्या त्या वेळी आपण क्षमासुद्धा मागितली आहे. पण माध्यमांनीही थोडेसे भान ठेवायला हवे. कोणत्याही घटनेचे चुकीचे अन्वयार्थ काढणे बरोबर नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले. येणार्या नव्या पिढीला सुंस्कृत करण्याचे काम आता पत्रकारांनीच करायचे आहे. अशा वेळी अक्षरांशी संबंध असलेल्या पत्रकारांनी ‘राक्षस होता कामा नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. पतंगराव कदम यांचेही याप्रसंगी भाषण झाले.
मध्यावधी निवडणुका नाहीत
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिले असून आपल्या कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी तयार रहा, असा सल्ला दिला आहे, याबाबत सुशीलकुमार शिंदे यांना विचारणा केली असता, सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल. त्याला कुठलाही धोका नाही. निवडणुका या ठरलेल्या वेळीच होतील. मध्यावधींची शक्यताच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
छायाचित्रात–
केसरीच्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी राज्याचे वनमंत्री पतंगराव कदम, केसरीचे मुख्य विश्वस्त डॉ दीपक टिळक, रोहीत टिळक आमदार दीप्ती चौधरी उपस्थित होत्या.
