सॅमसंग गॅलॅक्सी फोर आज भारतात

नवी दिल्ली दि.२६ – कोरियन कंपनी सॅमसंगने त्यांचा फ्लॅगशीप स्मार्टफोन गॅलॅक्सी फोर आज भारतीय बाजारात सादर केला आहे. पूर्वनियोजित घोषणेनुसार हा फोन काल म्हणजे २५ एप्रिलला भारतीय बाजारात सादर केला जाणार होता मात्र तो एक दिवस उशीरा सादर केला गेला आहे.

मार्च महिन्यातच जागतिक बाजारात हा फोन सादर केला गेला होता. आज भारताबरोबरच हा फोन यूएस व अन्य कांही युरोपिय बाजारपेठांमध्येही विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. भारतात या फोनची किमत ४० ते ४२ हजारांच्या दरम्यान असेल असेही सांगितले जात आहे. दोन व्हर्जनमध्ये कंपनीने हा फोन आणला आहे.

याची कांही वैशिष्ठ्ये म्हणजे ४.९९ इंची टच स्क्रीन, दोन जीबीची रॅम, १३ मेगापिक्सल कॅमेरा अशी सांगितली जात असून याला रेकॉडिगची सुविधाही देण्यात आली आहे.