राहुल महाजनसारखे लग्न करणार मल्लिका

कालपर्यंत लग्न करण्यास तयार नसलेली सेक्सी अभिनेत्री मल्लिका शेरावत लवकरच ‘द बैचलरेट इंडिया.. मेरे ख्यालों की मल्लिका’ या रियलिटी शो मध्ये दिसणार आहे. या शो मध्ये ती तिच्यासाठी जोडीदार शोधनार आहे. या शो मध्ये राहुल महाजनाप्रमाणे मल्लिका शेरावत जोडीदार निवडून त्याच्या सोबत लग्न करणार आहे.

लग्न केल्यानंतर तिला पब्लिसिटी मिळेल म्हणून तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी सेलिब्रेटी असलेल्या राहुल महाजनने ‘ राहुल का स्वयंवर’ या रियलिटी शो मध्ये डिंपी महाजन सोबत लग्न केले होते.

सध्या मलिक्का या शो च्या प्रमोशनच्या कामात व्यस्त आहे. या शो बाबत बोलताना मल्लिका म्हणाली, तसे पहिले तर तिला करण जौहर सर्वात बेस्ट वाटतो. पण आगामी काळात शोच्या माध्यमातून चांगला जीवनसाथी निवडण्याचा प्रयत्न असणार आहे.’ या शो च्या माध्यमातून मल्लिकाने आगामी काळात मीडियासाठी मात्र मोठा मसाला दिला आहे. या शोचे प्रसारण लाइफ ओके चैनलवर लवकरच होणार आहे.

Leave a Comment