झेड सुरक्षेचा खर्च मुकेश अंबानीच करणार

नवी दिल्ली, दि.२३ – उद्योगपती मुकेश अंबानी यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्याच्या निर्णयावर डाव्या पक्षांनी जोरदार टीकास्त्र सोडल्याच्या पार्श्वीभूमीवर, सुरक्षेसाठी येणारा खर्च स्वत: अंबानीच चुकता करणार आहेत, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. अलिकडेच अंबानी यांना एका पत्राद्वारे धमकी देण्यात आली. या पार्श्वकभूमीवर, त्यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय गृहमंत्रालयाने मंजुरी दिली.

अंबानी यांना २४ तास सुरक्षा पुरवण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) २८ सदस्यांची तुकडी निश्चिरत करण्यात आली आहे. या तुकडीसाठी दरमहा सुमारे १५ – १६ लाख रुपये इतका खर्च येणार आहे. दरम्यान, अंबानी यांना सुरक्षा पुरवण्याच्या निर्णयावर टीका झाल्याने सरकारकडून वरील स्पष्टीकरण देण्यात आले आहे. सीआरपीएफच्या कमांडोंसाठी अंबानी राहण्याची जागाही उपलब्ध करून देणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.