विद्या बालन झाली आता कपूर

बॉलीवुडमधील अनेक अभिनेत्री लग्नानंतर त्यांच्या नावापुढे पतीचे सरनेम लावतात. नुकत्याच लग्न झालेल्या बॉलीवुडची डर्टी गर्ल म्हणजेच विद्या बालनने आता लग्नानंतर तिचे नाव बदलून विद्या बालन-कपूर करण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या या नावातील बदलामुळे आता बॉलीवूडमध्ये आणखीन एका कपूरचा नव्याने बॉलीवुडमध्ये समावेश झाला आहे.

लग्नानंतर बॉलीवूडमधील ऐश्वर्य राय, करीना कपूर, रवीना टंडन, शिल्पा शेट्टी, लारा दत्ता, जेनेलिया डिसूजा आणि एशा देओल यांनी त्यांच्या नावापुढे पतिचे सरनेम जोडले आहे. ही सर्वच कुटुंबाची परंपरा आहे. त्यामुळेच आगामी काळात विद्या बालनने पति सिद्धार्थ राय – कपूरचे सरनेम तिच्या नावापुढे जोडले आहे. त्यामुळे आता विद्या बालन-कपूर असे तिचे नाव झाले आहे.

काही बॉलीवुडमधील अभिनेत्रिने लग्नानंतर पतिचे सरनेम त्याच्या नावापुढे जोडले नव्हते. त्यामध्ये हेमा मालिनी, शर्मिला टैगोर, सायरा बानो, मधुबाला, नूतन, मीना कुमारी, वहीदा रहमान, डिम्पल कपाडिया या अभिनेत्रीचा समावेश आहे.

Leave a Comment