भारतीयाच्या प्रतिसादामुळे सनी झाली खुश

भारतीय वंशाची पोर्न स्टार सनी लियोन गेल्या काही दिवसापासून भलतीच खुश आहे. सध्या तिला भारतीयाकडून चांगला प्रतिसाद लाभत असल्याने ती खूपच उत्साहित आहे. भारतीय प्रेक्षकाने सनीच्या प्रत्येक भूमिकाचा स्वीकार केला आहे. त्यामुळे आगामी काळात येत असलेल्या सिनेमाना देखील चांगला प्रतिसाद लाभेल असे तिला वाटते.

पंजाबी वंशाची असलेली सनी लियोन हिचे खरे नाव हे केरन मल्होत्रा आहे. भारतीय टीवीच्या रिएलिटी शो ‘बिग बॉस’ च्या पाचव्या भागात ती सहभागी झाली होती. त्यानंतर तिची ओळख झाल्याने तिला काही दिवसातच बॉलीवुडमधील ‘जिस्म -२’ या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली आहे. त्याशिवाय सनी सध्या ‘एक्सएक्सएक्स’ या पेय पदार्थची ब्रांड एम्बेस्डर आहे.

यावेळी बोलताना सनी म्हणाली, ‘ मी खूप खुश आहे की, माझा भारतीय नागरिकांनी स्वीकार केला आहे. त्यामुळे मी खुप खुश आहे. आगामी काळात वेगळे रोल करून सर्वांची मने जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे.’ आगामी काळात सनीचा संजय गुप्ताच्या ‘शूटआउट एट वडाला’ या सिनेमात आयटम सॉंग आहे. ‘त्यासोबतच एकता कपूरच्या ‘रागिनी एमएमएस-२’ या सिनेमात सनी मुख्य भूमिका करीत आहे.

Leave a Comment