शिल्पाची आता रीयल एस्टेटमध्ये एन्ट्री

गेल्या काही दिवसापासून सिनेमा त्यानंतर काहीकाळ क्रिकेटमध्ये नशीब आजमाविल्यानंतर आता अभिनेत्री शिल्पा शेट्टी नवीन बिजनेस सुरु करणार असल्याचे समजते. आगामी काळात शिल्पा रीयल एस्टेट बिजनेसमध्ये एन्ट्री करणार असल्याचे समजते. त्यसाठी तिने ग्रुप को डवलपर्स नावाची नवीन कंपनी लॉन्च केली आहे. तिची ही कंपनी जमीन मालकांना भेटून देशात हाउसिंग प्रॉजेक्ट लॉन्च करणार आहे.

याबाबत बोलताना आभिनेत्री शिल्पा म्हणाली, ‘आज मी एक मिडिल क्लास गर्ल आहे. आणि अजूनपण मी तसाच फील करते. त्यामुळे माझ्याकडून त्याच्या अपेक्षा वाढत आहेत. त्यामुळे आगामी काळात नागरिकांना स्वस्त, सुंदर व टिकाऊ अशा स्वप्नाला जोड देण्याचा हा माझा बिजनेस आहे. माझ्या सोबत या कंपनीत माझा दोस्त हेम तेजुजा पार्टनर आहे.’

या कंपनीत हेम तेजुजा व शिल्पाची ५०-५० भागीदारी आहे. त्यामुळे आगामी काळात शिल्पा बॉलीवुडमध्ये पुनरागमन करेल अशी तिच्या प्रशंसकाची असलेली आशा तिने सुरु केलेल्या या नवीन बिजनेसमुळे आता मावळली आहे.

Leave a Comment