अरुण जेटली फोन टॅपिंग प्रकरणात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली, दि. १७ – भाजपचे नेते अरुण जेटली यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात दिल्ली पोलिसांनी चार जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने तपास करून याप्रकरणी चार आरोपींच्या विरोधात 32 पानी आरोपपत्र तयार करून ते काल सादर केले.

पोलीस कॉन्स्टेबल अरविंद दबस, खासगी डिटेक्टिव्ह म्हणून काम करणारे अनुराग, नीरज आणि नितीश अशा चौघांच्या विरोधात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. अरुण जेटली यांच्या फोनवरून करण्यात आलेल्या कॉलचे रेकार्ड या चौघांनी संबंधित टेलिकॉम कंपन्यांकडून मिळवले होते. तथापि, कोणासाठी त्यांनी हे काम केले याचा तपशील मात्र पोलिसांकडून जाहीर झालेला नाही. भाजपच्या अंतर्गत सत्तास्पर्धेतूनच जेटली यांच्या फोन कॉल्सवर खासगी डिटेक्टिव्ह एजन्सीमार्फत लक्ष ठेवले जात होते, असा मुद्दा पुढे आला आहे.

Leave a Comment