पुण्याचा चेन्नईवर२४ धावांनी विजय

चेन्नई- आयपीएलच्या सहाव्या हंगामात पुणे वॉरियर्सने चेन्नई सुपर किंग्जवर 24 धावांनी विजय मिळवला.  चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात पुणे वॉरियर्सने प्रथम फलंदाजी करताना पाच बाद 159 धावा केल्या होत्या.  चेन्नईला मात्र 20 षटकात आठ बाद 135 धावा करता आल्या.

त्याआधी पुणे वॉरियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीकरण्याचा निर्णय घेतला होता. अँजेलो मॅथ्यूजच्या अनुपस्थितीत रॉस टेलरकडे पुण्याचे नेतृत्व देण्यात आले आहे.  पुण्याकडून आरोन फिंचने सर्वाधिक 67 धावा केल्या. तर स्टव्हन स्मिथने 37 धावांची खेळी केली.

विजयासाठी 160 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नईच्या कोणत्याही फलंदाजास मोठी धाव संख्या उभा करता आली नाही. सलामीचे आणि मधल्या फळीतील सर्व फलंदाज टप्प्या टप्प्याने बाद झाले. पुण्याकडून भुवनेश्वर कुमार, अशोक डिंडा, मिशेल मार्शल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

या सामन्यात जरी पुणे वॉरियर्सने चेन्नईवर विजय मिळवला असला तरी गुणतक्त्यात मात्र पुणे संघ अद्याप चेन्नईच्या खालीच आहे. चेन्नईने चारपैकी दोन सामन्यात विजय तर दोन सामन्यात पराभव स्विकारला आहे. तर पुणे संघाचा पाच पैकी तीनमध्ये पराभव आणि दोनमध्ये विजय झाला आहे. दोन्ही संघांचे गुण प्रत्येकी चार झाले असले तरी सरासरीच्या जोरावर चेन्नई गुणतक्त्यात सहाव्या तर पुणे सातव्या स्थानावर आहे.
पुणे- पाच बाद 159
चेन्नई- आठ बाद 135
सामनावीर- स्टीव्हन स्मिथ

Leave a Comment