सूर्यावरील स्फोटांचे परिणाम पृथ्वीवरही जाणवणार

वॉशिंग्टन, दि. 14 – गेल्या गुरूवारी दुपारी सुमारे साडे बारा वाजता सूर्यावर भीषण स्फोट झाला. आता पृथ्वीवर त्याचा परिणाम रविवारपासून जाणवू लागाला आहे. अवकाशात सोडलेले अनेक मानवनिर्मित उपग्रह आता ठप्प होण्याची शक्यता असून दळणवळण व्यवस्थाही विस्कळित होण्याची शक्यता असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

इस्त्रो ही भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि नासा या अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेबरोबरच जगभरातील शास्त्रज्ञ सूर्यावर होत असलेल्या स्फोटांचा बारकाईने अभ्यास करत आहेत. सूर्यावर दोन रिबनच्या आकृतीचा स्फोट सुमारे अडीच ते तीन तास होत राहिला.

इस्त्रोच्या अहमदाबाद येथील भौतिक संशोधन प्रयोगशाळेने 10 हजार सेकंदांपर्यंत सूर्यावर सुरू असलेल्या घडामोडींचे निरीक्षण केले आणि त्याची जवळपास 11 हजार छायाचित्रेही टिपली आहेत. सूर्याच्या पृष्ठभागावर झालेल्या स्फोटांमुळे 10 कोटी इलेक्ट्रॉनिक व्होल्ट ऊर्जा बाहेर पडली. ही ऊर्जा 100 मेगाटन हायड्रोजन बॉम्ब एकाच वेळी फुटल्यानंतर बाहेर पडणार्याक ऊर्जेइतकी होती, असे सूर्य आणि पृथ्वीच्या संबंधाबाबत संशोधन करत असलेल्या इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या पथकातील शास्त्रज्ञ राजमल जैन यांनी सांगितले.